Saturday, August 22, 2015

डॉ. एं . पी . जे अब्दुल कलाम

डॉ. एं . पी . जे अब्दुल कलाम यांस पत्र 

        आदरणीय ,
         डॉ. एं . पी . जे अब्दुल कलाम

               सर तुम्हीच  म्हणायचात ,आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी आधी आपल्या डोळ्यात स्वप्न हवीत,ती पूर्ण होण्यासठी लागणारा विचार  हवा  आणि हवी जिद्द.आपले लक्ष आपल्याला माहित असायला हवे . MOUNT   EVEREST चढायचा असो,नाहीतर तुमच्या CAREER मधील सर्वोच्च पदाचा तुमचा प्रवास असो,वर चढण्यासाठी प्रचंड ताकदीची,मेहनतीची गरज असते .आपण जे बदलू शकत नाही ते मान्य करून इतर पर्यायांचा विचार करून आपला प्रवास चालू ठेवता येतो,जो प्रश्नापुढे  हार न मानता ते सोडवण्यासाठी योग्य ती आखणी करू शकतो, तोच त्याच ध्येय गाठण्यासाठी यशस्वी होतो . 
              सर तुम्ही MISSILE  MAN होतातच;पण त्याही पलीकडे स्वप्नाची जी महाआण्विक शक्ती तुम्ही आमचात जागवली.तिची कदर लोकशाही व्यवस्थेतील मतपेट्यांना कळण जरा अवघडच आहे . 
             "DARE  To DREAM" हा मंत्र तुम्ही आम्हाला दिलात आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला शिकवलित.मनावरची मरगळ झटकायला मदत केलीत. आमचा धैर्य वाढवलत. देशाचा राष्ट्रपतींचा आपल्यावर भरोसा आहे. मनात आणल तर आपणही महासत्ता बनण्याचा भारतीय स्वप्नांचा एक भाग होऊ शकू हे आम्हाला पहिल्यांदाच कळल. सर,तुम्ही वाढवलीत आमची हिंमत. स्वप्नांवर विश्वास ठेऊन अखंड ध्येयाने वाट कशी चालायची, याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुम्ही आमच्या समोर  उभे राहता. त्या वाटेवरून जाण्यात महाप्रचंड कष्ट पडतात हे आम्हाला दिसलं. पण हेही दिसलं की त्या वाटेवरून चाललं तर माणूस किती उच्च पदावर पोहचू शकतो. ते पद असत माणसाच्या मनातल्या आदराचं. 
             या  देशातील  तरुण पिढी समोर आदर्श नाही असा समज करून घेणा~यांना तरुणांची मन कधी  समजलीच नहीत,ती तुम्हाला समजली. हि तरुण पिढी तुम्हाला आदर्श मानून वाट चालायला लागली आहे. परीश्रम,सचोटी,पारदर्शकता आणि गुणवत्ता हे गुणच माणसाला यशस्वी करतात हे तुम्ही पटउन दिलंत. आमच्या पिढी समोर आदर्शच नाही असं म्हणायचं करणाच उरलं नाही ,याला जबादार तुम्हीच !
                                                                                           
                                                                                                                      तुमचे लाडके 
                                                                                                                       विद्यार्थी 

Saturday, August 15, 2015

भारत प्रगती पथावरचा…………

आजच आपण सगळ्यांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण ह्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एक आढावा घेऊया कोणत्या बाबतीत देशाने प्रगती केली आणि अजून किती प्रगती आपल्याला करायची आहे याचा. 
         स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आपल्याला हव तसं आयुष्य जगण ना ? ब्रिटिशांपासून आपण स्वातंत्र्य मिळवलं याला ६९ वर्ष झाली. या दरम्यान खूप प्रगती झाली. गावोगावी शाळा, कॉलेज झाली. मुलाना शिक्षणाचा अधिकार मिळाला. government हॉस्पिटल मधून आरोग्याच्या सोयी सुविधा झाल्या. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं. बालकामगारांवर बंदी घालण्यात आली. आपल्या आवडत्या entertainment च्या दुनियेत पण खूप प्रगती झाली. गावोगावी रस्ते झाले. पत्रकारिता पण खूप कणखर झाली. TV च्या माध्यमातून सगळ्या बातम्या तात्काळ लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. शहरीकरण झाले. मुलांना नवीन तंत्रज्ञानाशी ओळख करून देण्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले. आणि त्याबद्दल आताच्या आणि पूर्वीच्या सरकारचे मनापासून अभिनंदन. 
          जेवढी प्रगती झालीय तेवढ्याच समस्या पण निर्माण झाल्या. शहरीकरण झाले पण कच~याचा प्रश्न निर्माण झाला.कच~याची विल्हेवाट हि मोठी समस्या आज भारतापुढे उभी आहे. त्यामुळे पसरणारी दुर्गंधी वातावरण कलुषित करते. त्या किटाणूंमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचे साम्राज्य पसरते. स्वच्छ सुंदर भारत योजना सरकारने राबवली खरी पण त्याचे अपेक्षित परीणाम अजून दिसत नाहीयेत. प्लास्टिक कचरा हा वेगळा चर्चेचा विषय बनत आहे.शाळा झाल्या अजूनही कित्येक मुलं त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत.  पावसाच्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नाहीयेय उत्तम उदाहरणं म्हणजे मुंबई. Government हॉस्पिटल्स तर आहेत पण तिकडे doctors ची कमरता आहे. यासगळ्यात भारतीय सिनेमा मात्र परदेशात जाऊन पोहोचलाय. आणि यशाची पावलं पुढे टाकतोय. शाळा कॉलेज मधून विद्यार्थी शिक्षण घेताहेत पण अपू~या रोजगाराच्या संधीमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेय. एकीकडे जीवनावश्यक वस्तु महागताहेत तर दुसरीकडे smartphones सारख्या वस्तूंची किंमत कमी होतेय. यामुळे शाळेत जाणा~या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांकडे smartphones दिसतात. अस असताना स्वच्छ पाण्याची मोठी समस्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अपु~या पावसामुळे आणि डोक्यावरच्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि शेतक~यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. 
         एकीकडे देश अवकाशात नवीन satellite सोडतोय तर दुसरीकडे भारत मातेच्या मुलींवर मात्र अत्याचार वाढत चालले आहेत. प्रगतीतील हे एवढी तफावत? भारतीय समाजहि अजून म्हणावा तसा सुधारलेला नाही. जातीपातीवरून अजूनही वाद होतात. कमी जातीच्या लोकांना अजूनही म्हणावा तसा सम्मान मिळालेला नाही. वेगवेगळ्या धर्माची लोक कधी एकत्र नांदणार कोण जाणे. 
          आपल्याला एक आदर्श भारत घडवायचा आहे. ज्यात प्रत्येक व्यक्तीला समान हक्क असतील कायद्यानुसार तसच समाजातही. प्रत्येक स्त्रीला योग्य तो सम्मान आणि सुरक्षितता मिळायला हवी. आपला भारत स्वच्छ सुंदर असायला हवा, ज्याच्याकडे इतर देश आदराने बघतील.  

Tuesday, August 11, 2015

'हिटलर'- एका राष्ट्रभक्ताचे ज्वलंत उदाहरण...!!!

'हिटलर'- एका राष्ट्रभक्ताचे ज्वलंत उदाहरण...!!!

जगाच्या इतिहासात फारच थोडी नावे काळ्या अक्षरात कोरली गेली त्यातीलच एक नाव होते-"ADOLF HITLER". हिटलरचे आयुष्य 56 वर्षांचे होते तर त्याने ज्यु लोकांवर केलेल्या अत्याचारांचा कालखंड फक्त 4 वर्षाचा होता. मग त्याचे उरलेले 52 वर्षाँचे आयुष्य आपण सहानुभुतीने तपासायला नको का...?जगाच्या इतिहासात एकाच आयुष्यात कायमस्वरुपी उलथापालथ करण्यासाठीच आपला जन्म होता अशी हिटलरची आपल्याविषयी कल्पना होती पण ती अगदीच अयथार्थ ठरली नाही कारण जगाच्या इतिहासात कुणी घडवली नव्हती एवढी उलथापालथ त्याने घडवली.हिटलरने ज्युंची केलेली कत्तल जर किळसवाणी असेल तर ब्रिटीश आणि स्टँलिन यांनी आपल्या देशात जी क्रुत्ये केली ती कमी लांच्छनास्पद नव्हती.अमेरिकेने निरापराध्यांवर अणुबाँम्ब टाकुनच युद्ध संपवले.हिटलर एवढे जेतेही पाशवी होते त्यामुळे हिटलरने ज्युंवर केलेले अपक्रुत्य नजरेआड करता त्याचे जे राष्ट्रवादी कर्तुत्व दिसुन येते ते समजुन घेतले पाहिजे. हिटलरने युद्ध सुरु होण्यापुर्वीच आँस्ट्रिया,हंगेरी,झेकोस्लोव्हाकिया व फ्रेँचांकडुन सार प्रांत फक्त धमकीच्या बळावर मिळवला.त्याची युद्धाची पुर्व आखणी बघुन पुरे जग स्तिमित झाले होते.तीन आठवड्यात पोलंडचा पराभव, पंधरा दिवसात नाँर्वेचा आणि महिन्याच्या आत फ्रान्सचा पाडाव करुन त्याने युरोपवर अधिराज्य संपादन केले. नेपोलियनला देखील एवढा मुलुख जिँकता आला नव्हता आणि हा विजय फक्त काही शेकडो सैनिकांच्या व मामुली दारुगोळ्याच्या मोबदल्यात हिटलरने हस्तगत केला.
        मित्रांनो,हिटलर होता तरी कोण?जवळजवळ सर्व युद्ध जिँकुन त्याचा पराभव का झाला?त्याची या युद्धात काय चुक झाली असेल?त्याने ज्युंचा संहार का केला असेल?हिटलर हे एकोणिसाव्या शतकातील सर्वशक्तिमान व्यक्तिमत्व होते.लोक त्याच्यावर करत असलेल्या टिकेचे प्रत्युत्तर म्हणुन हा लेख मी लिहीत आहे.हिटलरची बाजु पटवुन देण्यात मी यशस्वी होईन अशी अपेक्षा करतो. 
हिटलरचा स्वकर्तुत्वाबद्दलचा विश्वास-:
NOV 1918 मध्ये जर्मनीचा घात करणा-या बव्हेरियाची सत्ता उलथुन टाकण्याचा कट हिटलरने केला पण तो फसल्यामुळे त्याला न्यायालयात आरोपी म्हणुन हजर करण्यात आले.तेव्हा हिटलरने न्यायाधीशांना ठणकावुन सांगितले-"आमचा न्याय करणारे तुम्ही कोण?इतिहासाच्या स्वयंसिद्ध न्यायदेवतेने तो न्याय केव्हाच करुन ठेवला आहे."हिटलरला त्यावेळी तुरुंगात डांबण्यात आल्याने समोर सर्वत्र अंधार होता.असे असताना आपल्या आयुष्याने जे वळण घेतले त्याचा कडानकडा तितक्याच आत्मविश्वासाने जोपासणा-या हिटलरचे कोणालाही कौतुकच वाटेल.पुढे जर्मनीचा सत्ताधारी हिटलरने आपल्या बालपणाविषयी लिहीले असते तर त्याला अर्थ नव्हता.कारण यश मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने बालपण रेखाटण्याचा उद्योग अनेक महाभाग करतात परंतु हिटलरने आपले "माईन काम्फ" हे त्याचे आत्मचरित्र लिहीले तेव्हा त्याच्यापुढे भविष्यकाळ असा नव्हताच.होता तो फक्त स्वतःच्या कर्तुत्वाबद्दलचा विश्वास...!!!

हिटलरचे बालपण-:
हिटलर मद्य,मांसाहार आणि तंबाखुसेवन या व्यसनांपासुन पुर्णपणे अलिप्त होता.जे जे जर्मन आहेत त्याविषयी विलक्षण प्रेम आणि ज्या जर्मनवंशाशी एकरुप न झालेल्या जाती देशात वावरत आहेत त्यांच्याविषयी अतोनात तिरस्कार या दोन भावनांनी तो जबरदस्त भारला गेला.हिटलर वयाच्या 20 व्या वर्षी पोरका झाला. व्हिएन्ना शहरात आल्यावर त्याला कोणताच व्यवसाय त्याला जमेना.त्याच्याकडे राहते घर नव्हते तर भुक हा त्याचा एकमेव साथीदार होता.या काळातच त्याने मनात काही भयानक कल्पना पक्क्या केल्या होत्या त्यांची दखल पुढे इतिहासालाही घ्यावी लागली.
1) जनतेत प्रक्षोभ निर्माण करण्याचे मुलभुत कर्तव्य अंगी असल्याखेरीज कुठल्याही पक्षाला राजकीय अस्तित्वच राहत नाही.
2) यशस्वी प्रचारतंत्र ही कोणत्याही पक्षाची मुलभुत गरज आहे.
3)शारिरीक आणि मानसिक अत्याचारांची कुवत पक्षात असावी लागते.
4)कोणत्याही राजकीय पक्षाने धर्माची सुधारणा करण्याच्या भानगडीत पडु नये.
व्हिएन्ना शहरात हिटलरने ज्युंना फार जवळुन पाहिले होते.
हिटलर म्हणतो-"शहरातील वेश्याव्यवसाय आणि गुलामांच्या व्यवसायात मुख्यतः ज्युंचा हात आहे.
जेव्हा माझ्या लक्षात आले निर्लज्ज ह्रुदयशुन्य ज्युच या शहरात चालणा-या किळसवाण्या धंद्यांचा चालक मालक आहे.
तेव्हा माझ्या पाठीत एक सणक उत्पन्न झाली."
हिटलरचा राजकरणात प्रवेश-:
हिटलरला साक्षात्कार झाला होता की या जगात जगणा-या असंख्य किटकांप्रमाणे जगण्यासाठी आपला जन्म नाही.
आपल्यावर देशाचे काही उत्तरदायित्व आहे.या विचारानेच तो एक सैनिक म्हणुन पहिल्या महायुद्धात सामील झाला. 10 NOV 1918 ला जर्मनीने शरणागती पत्करली याचा उल्लेख हिटलर "नीचकर्माचा दिवस" असे करतो कारण त्यामुळे 20 लाख सैनिकांचे प्राणार्पण फुकट गेले.हिटलरकडील उपजत वक्त्रुत्वगुणांमुळेच त्याला GERMAN WORKERS PARTY कडुन सभासद होण्यासाठी निमंत्रण आले.हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण ठरला.त्याने राजकरणात पदार्पण केले.
सुरुवातीला अवघे 7 सभासद असलेल्या या पार्टीला त्याने आपल्या कर्तुत्वावर 2000 सभासद मिळवुन दिले.1 एप्रिल 1920 रोजी पार्टीचे नामकरण NATIONAL SOCIALIST GERMEN WORKERS PARTY असे करुन हिटलरने लोकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान करील असे निशाण पक्षाला मिळवुन दिले. लाल रंगाच्या निशाणावर मध्यभागी पौर्णिमेच्या चंद्रासारखा पांढरा गोल आणि गोलात काळे स्वस्तिक...!हिटलरने आपला 25 कलमी कार्यक्रम जाहीर केला. हिटलरच्या मते ज्याला जनसंमर्द हेलावता येतात त्यानेच नेतेपद मिरवावे.पक्षात दाखल झाल्यापासुन वर्षभरात हिटलरने श्रेष्ठतम वक्ता, चतुर संघटक आणि तुफानी प्रचारक म्हणुन प्रसिद्धी मिळवली.हिटलरचा "माझा लढा" हे आत्मचरित्र नाझीवादाची आचारसंहिता होती.हिटलरने वंशवादाचा पुरस्कार केला.त्याच्या मते ज्यांना जगायचे आहे त्यांना झगडा करावा लागेल. ज्यांची या अनादी संघर्षमय जगात झगडा करण्याची तयारी नसेल त्यांची जगण्याची लायकी नाही.
राज्य हे कर्त्या माणसाने चालवावे. त्याला सल्ला देण्यासाठी इतर माणसे असावीत परंतु सर्व निर्णय त्या कर्तुत्ववान पुरुषाचेच असले पाहिजेत.हिटलरचा लोकशाहीवर विश्वास होता. तो नेहमी सांगत असे,"मी सामान्य जनतेत वाढलो.मी या जनतेतच राहिलो आणि मी अडचणीच्या प्रत्येक वेळी जनतेकडेच येतो. मी माझ्या लोकांचे प्रतिनिधीत्व करतो यातच माझे सामर्थ्य आहे."पहिल्या भेटीनंतर चेँबर्लेनने हिटलरला पाठवलेल्या पत्रात लिहीले-"फार मोठ्या अपेक्षा तुझ्याकडुन आहेत. जेव्हा जर्मन देशाला गरज असते तेव्हाच एखादा हिटलर या देशात जन्म घेतो. हे जिवंत राष्ट्र आहे याचा प्रत्यय येतो. नियतीने कैसर विल्यम्सला जर्मनीचे पुनरुत्थान करण्यासाठी पाठविले होते. तो प्रयत्न फसला याबद्दल खेद नाही कारण तेच कार्य करण्यासाठी हिटलरचा जन्म आहे."व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर अपमानकारक अटी लादल्या. व्हर्सायच्या तहाविरुद्ध आणि वायमर प्रजासत्ताक विरुद्ध संतापाची जी ज्वाला जर्मनीत भडकत चालली होती त्याचाच प्रचंड वणवा करण्याचे महत्वाचे काम साधले ते हिटलरनेच...!त्याच सुमारास एका डाँलरला 4 ...मार्क्स एवढे असणारी जर्मन चलनाची किँमत एका डाँलरला 10000 मार्क्स एवढी कमी झाली.अशा प्रकारे अखेरीस 30 एप्रिल 1933 ला जर्मनीतील सर्वात मोठे राजकीय अधिकारपद CHANCELLER हिटलरला मिळाले.एका पाठोपाठ एक सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी हिटलर पुढे शरणागती पत्करण्यास सुरुवात केली. त्याने एका आठवड्यातच सर्व जर्मन देशाला 'एक निशाण-एक विधान-एक प्रधान' उपलब्ध करुन दिले.नाझी पक्ष हाच जर्मनीत यापुढे एकमेव राजकीय पक्ष राहिल असा फतवा काढला.जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेँब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले.
1 वर्षानंतर हिटलरने जेव्हा CHANCELLER पदाचा वाढदिवस साजरा केला तेव्हा त्याने कारकिर्दीवर नजर टाकली. केवळ एका वर्षात एवढ्या गोष्टी जगाच्या इतिहासात क्वचितच कोणी साध्य केल्या असतील.
1) वायमर प्रजासत्ताक उलथले होते.
2) हिटलर जर्मनीचा सर्वाधिकारी झाला होता.
3) राज्य सरकारे मध्यवर्ती सरकारचे केवळ शासकीय विभाग होती.
4) कामगारांमधुन कम्युनिष्टांचे उच्चाटन झाले होते
5) सर्व सामाजिक संस्थांमधुन ज्युंची हकालपट्टी झाली होती.
6) जर्मनीभोवतीचा दोस्तांचा फास सैल झाला होता.
7) पोलंडचा मासा गळाला लागला होता.
याच वेळी होत असलेल्या 1000 अंतर्गत विरोधकांना 30 जुन 1934 या एकाच दिवशी S.S. संघटनेच्या मदतीने गोळी घालुन संपवुन टाकले.2 AUG 1934 ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हिँडेनबर्ग यांचे व्रुध्दत्वाने निधन झाल्याने हिटलरने CHANCELLER आणि PRESIDENT पद एक करुन स्वतःला राष्ट्राचा सर्वाधिकारी व सैन्याचा सरसेनापती म्हणुन घोषित केले.अध्यक्ष हे नामकरण रद्द करुन FURRER आणि CHANCELLER अशी दोन बिरुदे हिटलर वापरु लागला.हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण अमूलाग्र केले.शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला.'राईश अन्नसाठा' यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या... पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला.जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामूळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते.जर्मनीने आर्थिक क्षेत्रात प्रगती केली ती शस्त्रोत्पादनांच्या धोरणामुळेच.या सर्व योजनेला 'युद्धकालीन अर्थकरण' म्हणतात.हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चाके प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली.कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल.हिटलरने एव्हाना आंतरराष्ट्रीय धोरणावर लक्ष केँद्रित करत चतुराईने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले.फ्रान्स-रशिया यांच्या वाढत्या मैत्रीचे कारण पुढे करुन व्हर्सायच्या तहात फ्रेँचांना दिल्या गेलेल्या RHINELAND चा कब्जा मिळवला.AUSTRIYA देशाचा CHANCELLER शुशेगिनला युद्धाची धमकी देत 70 लाख लोकसंख्येचा हा देश रक्ताचा एकही थेँब न गाळता जर्मन देशाचा प्रांत केला.इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनीशी मैत्रीचा करार केला.सुडेटन प्रांतातील जर्मनांनवर होत असलेल्या अन्यायाचे कारण पुढे करत हिटलरने युद्धाची धमकी देत म्युनिच येथे इंग्लंड, फ्रान्स, इटली या देशांच्या प्रतिनिधीँना बोलावुन "म्युनिच करार" करत आपल्याला हवा असलेला झेकोस्लोव्हाकियाचा भाग मिळवला. पुढे म्युनिच करार मोडत काढत झेकोस्लोव्हाकियाचे तत्कालीन अध्यक्ष हाच यांना युद्धाची धमकी देत उर्वरित झेक गिळंक्रुत केला एवढ्यावरच थांबला तर तो हिटलर कसला...? हिटलरचा डोळा पोलंडवर होता.
        युद्धाची ठिणगी पडेल या भितीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी हिटलरला पत्र पाठवुन 31 राष्ट्रांची नावे देत त्यावर तो हल्ला करणार नाही याची खात्री द्यायला सांगितले.त्यांना नम्र भाषेत उत्तर देत हिटलर म्हणाला-"तुमचा देश विशाल असुन अफाट संपत्तीवाला आहे.त्यापेक्षा फारच लहान कार्यक्षेत्रात मी काम करतो.मी जेव्हा माझ्या देशाची सुत्रे हातात घेतली तेव्हा तो सर्वनाशाच्या उंबरठ्यावर होता पण सुव्यवस्था निर्माण करण्यात मी यशस्वी झालो. उत्पादन अनेक पटीँनी वाढवले. वाहतुकीच्या सोयी केल्या. रस्ते, कारखाने बांधले.हे सर्व एकीकडे करत असताना शिक्षण आणि संस्क्रुती दोन्ही प्रगतीपथावर नेण्याचा मी प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धात जे प्रांत आमच्यावर दरोडा घालुन लांबवण्यात आले ते मी रक्ताचा अभिषेक न करता, जगाला युद्धाच्या खाईत न ढकलता परत मिळवले.दुर्देवाने माझे जग फारच लहान आहे. असे असले तरी इथे काम करणे हे मी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मुल्यवान मानतो कारण माझे जग लहान असले तरी हे माझ्या देशबांधवांचे जग आहे."हिटलरची आपल्या राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम या पत्रातुन दिसुन येते. हिटलरला काही करुन पोलंडवर आक्रमण करायचे होते पण इंग्लंड व फ्रान्स यांच्या पाठिँब्यामुळे तो ते करत नव्हता.त्याने रशियाशी 20 वर्षे अनाक्रमणाचा करार करुन नवी राजकीय खेळी केली. मात्र जर्मन जनताच मुळी या युद्धाला तयार नव्हती. याबाबतीत हिटलरला विचारले असता त्याने सांगितले-
"जो विजयी होतो त्याला कुणी हे विचारत नाही की त्याने युद्धाला जे कारण सांगितले होते ते खरे होते की खोटे...?युद्ध सुरु करताना आणि लढताना महत्व असते फक्त अंतिम विजयालाच...!!!"
पोलंडमध्ये जर्मन नागरिकांवर अत्याचार वाढत आहेत हे कारण पुढे करत अखेर 1 सप्टेँबर 1939 ला पहाटे 4 वाजुन 45 मिनिटांनी हिटलरने युद्धास सुरुवात केली.
         इंग्लंड पोलंडच्या मदतीला धावुन जाण्याआधीच हिटलरने BLITZCREIG या युद्धतंत्राने पोलंडचा अवघ्या 1...2 दिवसात खात्मा केला."जीव घेणारी झडप" या तंत्राचे जगाला घडलेले हे पहिले रौद्र दर्शन!फायटर जातीच्या बाँम्ब फेकणा-या विमानांनी आकाशातुन बाँम्ब फेकत शत्रुभुमीवर आगीचे वणवे निर्माण करायचे, स्टुका जातीच्या विमानांनी सुर मारीत झेप घेत शत्रुची मोक्याची ठिकाणे उद्धस्त करायची व या भयानक छत्राखाली टँक दलाने 30 ते 40 मैल मुसंडी घ्यायची असे हे भीषण तंत्र होते.यावरुन हिटलर आपल्या लढाई तंत्रात किती प्रगत होता हे दिसुन येते.जर्मनीचे भयानक आक्रमण पाहुन फ्रान्स घाबरले कारण त्यांना आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तु प्रिय होत्या पण इंग्लंड सोबतच्या मैत्री कराराने ते युद्धात ओढले गेले.हिटलरने आता डेन्मार्क व नाँर्वेच्या या दोन्ही देशांच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले.
        डेन्मार्कने फक्त निषेध व्यक्त करुन शरणागती पत्करली पण झुकण्यास तयार नसलेल्या नाँर्वेला युद्धात चारी मुंड्या चीत करत हिटलरने या दोन्ही देशांचा कब्जा मिळवला.इंग्लंडच्या मदतीचा या दोन्ही देशांना काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चेँबर्लेन यांना पाय उतार करुन 10 मे 1940 ला विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
      दरम्यानच्या काळात हिटलरने HOLLAND शी युद्ध करुन त्यांचा कब्जा मिळवला.डंकर्क येथे ब्रिटीशांच्या सैन्यावर हल्ला करुन त्यांना तेथुन माघार घ्यायला लावले. त्यांची सारी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जर्मनीच्या हाती पडला.आता हिटलरने इंग्लंडला पुरते कोँडीत पकडले होते व विमानातुन लंडनवर बाँम्बवर्षाव सुरु केला. इंग्लंडचा पराभव समोर दिसत होता. सारे जग स्तिमितावस्थेत ढकलले गेले होते परंतु या नैराश्येत चर्चिलने मात्र निश्चल राहुन जनतेला शेवटपर्यँत लढण्याचे व कोणत्याही परिस्थितीत शरणागती न पत्करण्याचे आवाहन केले.याच्या अगदी विरुद्ध इंग्लंडचे दोस्तराष्ट्र असलेल्या फ्रान्सने जर्मनीसमोर 22 जुन 1940 ला शरणागती पत्करुनशस्त्रसंधी करार केला 1914 च्या पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मन सैन्याला 4 वर्षे लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केलेला. मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मनी कराराची घटना हिटलरने घडवुन आणली होती.इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडले असेल तर ही दुर्बलता अचुक हेरुन ती वाढवली हिटलरनेच.फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अचुक अंदाज फक्त हिटलरला होता व त्यांना चुटकीसरशी नेस्तनाबुत करता येईल या हिशोबानेच त्याने सेनानीँच्या विरोधाला न जुमानता फ्रान्सचा पराभव घडवुन आणला.त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.अंती झालेल्या पराभवाचे खापर जर हिटलरच्या माथी फुटणार असेल तर या सर्व विजयाचे श्रेय हिटलरचेच आहे व ते त्यालाच द्यावे लागेल.जर्मन सैन्य थकल्याने आणि सर्व जगावर वर्चस्व प्राप्त केल्याने हिटलरला आता जगात शांतता प्रस्थापित करायची होती. पण सोयीप्रमाणे युद्ध बंद करायचा हा हिटलरचा डाव चर्चिलने उधळुन लावला.नाईलाजाने जर्मन विमानांनी इंग्लंडवर बाँम्बवर्षाव सुरु केला.इंग्लंडमध्येही त्यावेळी रडारयंत्राचा शोध लागला होता.परिणामी जर्मनीच्या अनेक विमानांचा नाश झाल्याने फक्त रात्रीच हल्ला करण्याचे आदेश हिटलरने दिले व हीच त्याची "लष्करी चुक" ठरली.जर्मनीने दिवसरात्र बाँम्बवर्षाव आठवडाभर चालु ठेवला असता तर इंग्लंडला भाजुन काढुन जर्मन सैन्य इंग्लंडमध्ये आले असते.अनाक्रमणाच्या कराराचा फायदा रशिया जर्मनीकडुन उठवु लागले.रशियाने जर्मनीकडुन पोलंडचा जवळजवळ 77000 मैल प्रदेश घेतला आणि युद्ध करुन जर्मनीला फक्त 73000 मैल प्रदेश मिळाला.हिटलरने जपान-इटली-जर्मनीमध्ये लष्करी करार केला पण त्याच्या कारस्थानांना ओळखुन स्टँलिनने रशियाला त्यात सामील करुन घेण्याचा हट्ट धरला.त्यावर हिटलर म्हणाला स्टँलिन हा डोकेबाज व लुच्च्या आहे. त्या हरामखोराला जर्मनीचे विजय पाहवत नाहीत. त्याच्या कारस्थानांना रोखण्यासाठी हिटलरने रशियावर हल्ला करण्याचे नक्की केले.आपला पराभव करणारी शक्ती अजुन जन्माला यायची आहे या भ्रामक समजुतीत हिटलर वावरत होता. त्याला आता कोणाचीच भिती वाटत नव्हतीहिटलर आपला दोस्त असुनही आपल्याला कोणत्याही हल्ल्याची पुर्वकल्पना देत नाही यामुळे मुसोलोनी दुखावला होता.आपली ताकद हिटलरला दाखवण्यासाठी त्याने हिटलरला कोणतीही पुर्वसुचना न देता ग्रीसविरुद्ध युद्ध पुकारले.हिटलर दुरद्रुष्टी ठेवुन जाणारा नेता होता. त्याला एवढ्यात बाल्कन प्रदेशात युद्ध करायचे नव्हते.ग्रीकांच्या कडव्या प्रतिकाराने डाव अंगलट आल्यामुळे मुसोलोनिने मदतीसाठी हिटलरला हाक दिली.दोस्तीबाबत आपले कर्तव्य चोख पार पाडत हिटलरने ग्रीकांना चारी मुंड्या चीत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घासही गिळला.त्यानंतर मात्र 5000 जर्मन सैनिकांचा बळी देऊन क्रिट बेट मिळवत भुमध्य समुद्रात शत्रुला पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही.त्याच दरम्यान हिटलरचा जनरल आर्विल रोमेलने यावेळी पराक्रम करत इजिप्तमध्ये जर्मनीला चमत्कारिकरित्या विजय मिळवुन दिला.इंग्लंड आता सर्व बाजुंनी कोँडले गेले होते व त्यांचा पराभव पुर्णपणे दिसत होता.एक चर्चिल नसता तर दुसरे महायुद्ध यावेळी संपल्यासारखे होते याचा हा पुरावा आहे.
हिटलरने रशियावर आक्रमणाची तारीख निश्चित केली होती ती "15 मे 1941"पण मुसोलोनिच्या उतावीळपणामुळे त्याला बाल्कन प्रदेशात युद्ध करावे लागले. या युद्धाने 4 आठवडे रशियावरील हल्ला पुढे ढकलुन हिटलरने फार मोठा धोका पत्करला होता. रशियाला नेस्तनाबुत करण्यासाठी फक्त 6 महिन्याचा कालावधी त्याच्याकडे होता. कारण रशियातील थंडीत डिसेंबरमध्ये बर्फ पडु लागले आणि तोपर्यँत जर रशियाने शरणागती पत्करली नाही तर जे नेपोलियनच्या सैन्याचे हाल झाले तेच हाल आपल्या सैन्याचे होतील याची खात्री हिटलरला होती. पण नाहीतर हा हल्ला मे 1942 पर्यँत पुढे जाण्याची शक्यता होती. हिटलरच्या हिशेबाने 6 महिने पुरेसे होते पण पराभवाची पुसटशी कल्पनाही त्याला येऊन गेली होती.शेवटी वाट पाहण्यात अर्थ नाही असे म्हणुन "22 जुन 1941" ला त्याने रशियावर आक्रमण केले. जी चुक नेपोलियनने केली तीच अखेर हिटलरने केली. आणि या सर्वासाठी कारणीभुत ठरला तो 'मुसोलोनीचा उतावीळपणा'...!हिटलरच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चुक ठरली...!!!हिटलरने नेहमीप्रमाणे दिमाखात आक्रमण करत रशियन सैन्याची दाणादाण उडवली. डिसेँबरपर्यँत सर्व सुरळीत चालु होते. मात्र जसजशी थंडीला सुरुवात झाली जर्मन सैन्याचे हाल होऊ लागले.अखेर 6 डिसेँबर 1941 ला जर्मनीला दुस-या महायुद्धात प्रथमतः पराभवाला सामोरे जावे लागले.हिटलरने कोणत्याही परिस्थितीत सैन्य मागे घ्यायचे नाही हा आदेश दिला तरी काही उपयोग झाला नाही.
रशियाकडे फक्त 200 DIVISIONS सैन्य असेल हा हिटलरचा अंदाज चुकला प्रत्यक्षात ते 360 DIVISIONS होते.
हिवाळ्यातील थंडीत जर्मन सैन्य माँस्कोपासुन वेगवेगळ्या दिशांनी 75 ते 200 मैल मागे हटले होते. 202251 सैनिक मारले गेले,525642 जखमी झाले तर 46511 बेपत्ता होते. एवढी मनुष्यहानी महायुद्ध सुरु झाल्यापासुन हिटलरने पहिल्यांदाच पाहिली होती7 डिसेँबर 1941 ला जपानने हिटलरला कोणतीही पुर्वकल्पना न देता अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर हल्ला केला.जे नको होते तेच झाले.लष्करी करारामुळे हिटलरला अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा करणे भाग पडले.6 महिन्यापुर्वी हिटलरला घायाळ ब्रिटन हा एकच शत्रु होता तर जर्मनीने युद्ध जवळजवळ जिँकले होते पण आता जगातीला तीन मोठी उद्योगप्रधान राष्ट्रे ब्रिटन,रशिया आणि अमेरिकेविरुद्ध हिटलर एकटा लढत होता.रशियात त्याचे निर्णय पुरते चुकु लागले होते.
काँकेशसमध्ये 50000 तर स्टँलिनग्राडला 150000 रशियन सैन्य जमा असताना ही दोन्ही ठिकाणे एकदम मिळवायचा अशक्यप्राय प्रयत्न हिटलरने केला. हि त्याची "तिसरी लष्करी चुक" ठरली.हिटलरच्या पराभवाचे टोले आता जर्मनांना ऐकु येत होते.रशियात सर्वत्र पराभवाचे सत्र चालु असताना शरणागती पत्करण्यास हिटलर तयार नव्हता. जर्मनीला पराभवापासुन वाचवण्यासाठी हिटलरला पदच्च्युत करुन नवीन जनरलने शरणागती पत्करावी असा एक गट विचार करत होता.आपल्या पराक्रमामुळे रोमेल त्यावेळी हिटलर एवढाच जर्मन जनतेत प्रसिद्ध असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.पण हा डाव लक्षात आल्यावर हिटलरने रोमेलला विष पिऊन आत्महत्या करण्यास सांगितले कारण रोमेलला मारले असते तर जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला असता.याच दरम्यान 20 जुलै 1944 ला स्टुफेनबर्ग या माथेफिरु ग्रुहस्थाने टाईमबाँम्बचा वापर करुन हिटलरला उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण नशीबाने हिटलर त्यातुनही बचावला.
हिटलरची इच्छाशक्ती प्रबळ होती.सगळीकडे पराभव होत असताना या बिकट परिस्थितही सैन्याला खंबीरपणे सांगत होता-
"विजय मिळवणारच असा शत्रुचा विश्वास नष्ट करुन टाकणे आवश्यक आहे. युद्धाचे निर्णय तेव्हाच लागतात जेव्हा आपण जिँकु शकत नाही अशी एका कुण्यातरी बाजुची खात्री होते. शत्रुला आपण क्षणाक्षणाला आठवण करुन दिली पाहिजे त्यांनी काही केले तरी आम्ही शरणागती पत्करणार नाही."15 डिसेँबर 1945ला हिटलर अखेरचा जुगार खेळला. त्याने आर्देन्समध्ये मुसंडी मारली परंतु दोस्तांसमोर जर्मनीचा निभाव लागला नाही व माघार घेतल्यामुळे हिटलर बर्लिनमध्ये कोँडला गेला.पराभव नक्की झाल्यावर त्याची कारणीमांसा करावी व कुठे काय चुकले ते पुढच्या पिढीला सांगावे याद्रुष्टीने त्याने आपले मनोगत लिहीले. त्यात पराभवाची कारणे व पुढील काळात राष्ट्राच्या उद्धारासाठी जर्मनीने काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
‎1) निसर्गतः ज्यु हे बांडगुळासारखे आहेत. त्यांना सामावुन घेणे अशक्य आहे.
तो ज्या समाजात राहुन अधिकार भोगतो त्यांच्याशीच शेवटी गद्दारी करतो.
2) रशियावर हल्ला करण्याचा निर्णय सर्वात गंभीर निर्णय होता. मुसोलोनिने ग्रीसवर स्वारी करण्याचा मुर्खपणा केला नसता तर रशियाला चारी मुंड्या चीत केले असते.मुसोलोनिसोबतची दोस्तीच पराभवला कारणीभुत आहे. दुर्देवाने निसर्गाचे नियम हेच सांगतात की,जे आपल्या योग्यतेचे नाहीत त्यांना आपल्या बरोबरीचे समजणे ही चुक ठरते. जगात दुर्बलतेला क्षमा नाही.
3) जपान दोस्त असुनही रशियाविरुद्ध युद्धात उतरला नाही याचे वाईट वाटते.
4) युद्धानंतर सुद्धा सर्व जर्मन जातीँचे जे अभेद्य एकीकरण मी घडवले आहे ते टिकवावे. एकीतच बळ आहे.
5) जगात यानंतर अमेरिका आणि रशिया या दोनच मोठ्या शक्ती अस्तित्वात राहिल्याने त्यांच्यातील संघर्ष अटळ आहे.
जर्मनीने कोणाच्या ताटाखालील मांजर बनु नये.
6) पुर्वेच्या दिशेनेच जर्मनीने आपल्या वंशाच्या नसा वाढवाव्यात.
7) 1940 साली स्पेनवर आक्रमण करुन युद्धात ओढले असते तर जिब्राल्टरचा कब्जा जर्मनीला करता आला असता.
8) युद्धातील जर्मन जनतेचा यत्न व त्याग इतक मोठा आहे की सर्वच्या सर्व निरर्थक ठरेल यावर माझा विश्वास नाही.
9) मी चांगले बी पेरले आहे. एके दिवशी पिक बहरास येईल. दुनियेतील कोणतीही शक्ती त्यावेळी विरोध करु शकणार नाही.
        20 एप्रिल 1945 ला हिटलरने आपला 56 वा वाढदिवस बर्लिनमध्ये भुमीखालील निवासात साजरा केला.इव्हा ब्राऊन या तरुणीशी हिटलरचे 10 वर्षे प्रेमसंबंध होते.हिटलरची पत्नी या नात्याने मरावे अशी तिची शेवटची इच्छा होती. 30 एप्रिलला पहाटे रशियन सैन्य बर्लिनमध्ये घुसेल याची हिटलरला खबर मिळाली.29 एप्रिलला अपरात्री 1 ते 3 च्या दरम्यान त्याने इव्हा ब्राऊनला आपली पत्नी म्हणुन मान्यता देण्यासाठी विवाह समारंभ आयोजित केला व तिला दिलेले वचन पुर्ण केले.म्रुत्युच्या दाट छायेत असा विलक्षण विवाह समारंभ कधी झाला नसेल व यापुढेही कधी होणार नाही. जसे हिटलरचे सगळे आयुष्यच विलक्षण होते त्याला साजेसाच त्याचा विवाह होत होता व म्रत्यु निश्चित झाला होता. विवाहानंतर काही तासातच वधु वरांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांचे डोळे पाणावले. काहीँना रडणे आवरतच नव्हते. हिटलरवर ही माणसे व तमाम जर्मन जनता असे आंधळे प्रेम का करत राहिली?तो केवळ कर्तबगार नेता होता म्हणुन??जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमित झाले. इंग्लंडच्या साम्राज्याला आव्हान देत ते खिळखिळे करुन टाकले.रशियन अस्वलांच्या नाकात चांगलीच वेसण घातली.जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली.1918 साली झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले.युद्ध भयानक असते पण देशाची बेईज्जत ही युद्धापेक्षा भयानक असते.त्यामुळेच सर्व जर्मन जनता हिटलरवर जीवापाड प्रेम करत होती.29 एप्रिलला मुसोलिनी आणि त्याच्या प्रेयसीची इटलीत गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. दोघांची प्रेते रस्त्यात उलटी टांगण्यात आली. एखाद्या बेवारस कुत्र्यांप्रमाणे प्रेतांवर प्रहार करणे व प्रेयसीच्या उघड्या इंद्रियात काड्या घालणे असे प्रकार सुरु झाले. हिटलरच्या कानावर ही बातमी येताच त्याने आपल्या म्रुत्युची तयारी सुरु केली.आपल्या व इव्हा ब्राऊनच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात यावे तसेच या जगातुन लष्करी सन्मानाने निरोप घ्यावा अशी हिटलरची इच्छा होती.त्यासाठी त्याने 200 लिटर गँसोलिन मागावुन घेतले.
        प्रथमतः त्याने आपल्या इमानदार कुत्र्याची गोळी घालुन हत्या केली.सर्वाँचा निरोप घेऊन तो आणि त्याची पत्नी दोघे आपल्या खोलीत गेले. खोलीतुन काही क्षणातच पिस्तुल उडवल्याचा आवाज आला. तिथल्या सोफ्यावर सर्वाँचा लाडका हिटलर निष्प्राण अवस्थेत पडला होता तर इव्हा ब्राऊनने विष पिऊन आत्महत्या केली होती. तारीख होती 30 एप्रिल 1945 आणि वेळ होती दुपारचे साडेतीन...! हिटलरच्या 56 व्या वाढदिवसानंतर 10 दिवसांनी व जर्मनीचा CHANCELLER झाल्यावर 12 वर्षे 3 महिन्यांनी तिस-या राईशच्या जन्मदात्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्या दोघांना भरपुर गँसोलीन ओतुन अग्नि देण्यात आला व नाझी पद्धतीने लष्करी वंदना केली गेली. हिटलरचे तिसरे राईश 13 व्या वर्षात असे रसातळाला गेले.या महान राष्ट्रातील कर्तबगार आणि शुर परंतु आंधळेपणाने व्यक्तीपुजा बांधणा-या जर्मन जनतेला या राईशने अभुतपुर्व असे शक्तिमान करुन सोडले.कधीही जिँकली नव्हती एवढी भुमी या राईशने आपल्या वर्चस्वाखाली आणली होती आणि हे घडते तोच हे तिसरे राईश एकाएकी संपुर्णपणे असे उन्मळुन पडले की जगाच्या इतिहासात असला जय आणि पराजय कुणा राष्ट्राने कधीच अनुभवला नव्हता.
तिसरे राईश आता इतिहासजमा झाले होते...!

(लेखक )
अनुपम कांबळी 

बाबा

  बाबा      

        आईचा लळा वेगळा असतो, मान्य आहे. आईची माया वेगळी असते, मान्य आहे. आईसारखी दुसरी कोणीच नाही, हे देखील मान्य आहे. पण बाबासुद्धा तितकेच लढतात… तितकेच खंबीरपणे मुलाच्या पाठीशी उभे राहतात… तितकाच जीव लावतात…! मुलं नीट सेटल होतायेत ना, हे बघण्यातच त्यांच उभ आयुष्य निघून जात. नसतील होत तर त्यांना सेटल करण्यात जात. त्यांना सगळ येण अपेक्षित असत. बाबांकडे 'नाही' हा शब्द नसतोच बहुधा…! आई ग्रेट असतेच किंबहुना ती मायमाऊली असते पण बाबा फक्त बाबा असतात. मुलीचं पाहिलं प्रेम आणि मुलाचा पहिला हिरो त्याचे बाबाच असतात. दुनियेतल्या प्रत्येक मुलासाठी बाबा ते असतात जे सगळे ऑप्शन संपले की सुरु होतात. आणि मग पाऊले आपोआप त्यांच्या दिशेने वळु लागतात. A friend, guide & philosopher…!!!

        प्रत्येक बापासाठी त्याचा मुलगा-मुलगी हा त्याचा अभिमान असतो. जेव्हा त्यांना आपल्या मुलाप्रती वाटणारा अभिमान सर्वांच्या समोर व्यक्त करायचा असतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आपसूकच पाण्याच्या धारा येतात.

बाबा… एक बापमाणुस… कामाचा कितीही ताण असला तरी घरी न आणणारे 'सुपरकुल' बाबा... कुठलंही काम 'हो जायेगा' असा म्हणणारे 'जादुगार' बाबा... आपल्यावर सर्वात जास्त विश्वास टाकणारे आपले बाबा…. रडत असलो की कुशीत घेणारे बाबा… मात्र कधीही आपल्यासमोर न रडणारे बाबा… म्हणूनच प्रत्येकाच्या मनातल अढळस्थान म्हणजे बाबा….!
                                                                                                                                                (लेखक)
                                                                                                                                          अनुपम कांबळी 

आजची स्त्री

आजची स्त्री


आपण म्हणतो आजची स्त्री, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. पण तरीही मला अस वाटत कि, आजही स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले नाही. जर आपण इतिहासात पहिले तर अनेक स्त्रियांची उदाहरणे दिसतात. जस कि झाशीची राणी, तिने कमरेला मुल बांधून लढाई केल्याचा कथा आपण वाचल्या आहेत. पण त्या काळात इतर स्त्रियांवर मात्र बंधन होती. याचा अर्थ असा होतो का कि त्या पराक्रमी नव्हत्या? तर तसं नाहियेय त्यांना योग्य ते शिक्षण आणि संधी मिळाली नाही. त्यांना फक्त चूल आणि मुल यापुरतच मर्यादित ठेवलं गेलं. 
        २० व्या शतकातील स्त्रियांना तर ब~याच अंशी मागास जीवन जगावे लागत होते. वैधव्य दु:सह ठरत होते, बालविवाह बोकाळले होते, शिक्षणाचा तर पत्ताच नव्हता. स्त्रियांसंदर्भातील रूढीग्रस्तता भयंकर होती. चौथी, पाचवीतले शिक्षण थोर समजले जात होते. 
       त्याही आधीच्या शतकभरामध्ये राजाराममोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांनी सतीसारख्या कुप्रथेला विरोध केला. तसेच सावित्रीबाई,रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, गंगाबाई यांच्यासारख्या कित्येकजणींनी आपले सर्वस्व पणाला लावल्यामुळे बायकांच्या जगात पहाट फुटू लागली होती. 
        २१व्या शतकातील स्त्रीचे आयुष्य त्यामानाने बरचसे सुसह्य आहे. मुली शिक्षण घेताहेत, नोकरी करतात, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. पण तरीही आजही स्त्रिला म्हणावी तशी सुरक्षितता मिळालेली नाही. मुलींवर होणा~या बलात्कारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आईवडिलांना मुलगी नकोशी झाली आहे. हुंड्यासाठी कित्येक जणींचे बळी गेलेत आणि अजूनही जाताहेत. मुलगी नको म्हणून गर्भपात होत आहेत. म्हणजे खर पाहता मुलगी कुठेच सुरक्षित नाही. आईच्या गर्भातही नाही आणि बाहेरच्या समाजातही नाही. आजही कित्येक घरात मुलाला शिकवायचं आहे म्हणून मुलीचं शिक्षण अर्धवट सोडलं जात. आजही मुली रात्री उशिरा पर्यंत काम करू शकत नाहीत. आजच्या स्त्रीच आयुष्य फक्त चूल आणि मुल अस नसलं, तरी घराबाहेर पडल्यानंतर तिला या समाजाने उभ्या केलेल्या कितीतरी प्रश्नांना उत्तर द्यावीच लागतात. 
        मग या सगळ्याला जबाबदार कोण? सरकार, न्यायव्यवस्था कि अजून कोणी? या दोन गोष्टींशिवाय या सगळ्याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत. झालेल्या अन्यायानंतर कडक कारवाई केली जात नाही किंवा त्यांना योग्य ते शासन केलं जात नाही याला नक्कीच सरकार आणि न्यायव्यवस्था जबाबदार आहेचं पण तरीही नागरीक म्हणून आपली काही जबाबदारी नाही का? आपल्या घरातल्या स्त्रियांना स्वसंरक्षणाचे शिक्षण का दिले जात नाहीत? जर स्त्रिया सबळ झाल्या तर निम्म्या अपराधाच्या घटना कमी होतील. स्वसंरक्षणाचे धडे शाळांमधुन दिले गेले पहिजेत. 
        आपण म्हणतो कि समाज आजकाल खूप पुढे गेलाय पण तरीही समाजाची स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदललेली नाही. समाज तेव्हाही तिला वस्तू म्हणूनच पहायचा आणि आजही तसाच पाहतो. 
       पण आपल्याला हि मानसिकता बदलायची आहे. स्त्रिला या समाजात ताठ मानेने जगता आले पाहिजे. तिला योग्य तो मान मिळायलाच हवा. आणि हा बदल आपल्यासारखी तरुण पिढीच घडवून आणु शकते, नाही का?  

Friday, August 7, 2015

कॉलेज विश्व

ह्या रविवारी आपण सगळ्यांनी friendship day  साजरा केला. म्हणूनच हि नवीन पोस्ट मित्रांसाठी. 

 कॉलेज विश्व

कॉलेज  विश्व! पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंतचा हा ४ वर्षांचा प्रवास म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय काळ.
        कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटणारा एकटेपणा नंतरनंतर कुठे गायब होतो  स्वत:ला पण कळत नाही. कॉलेजच्या पहिल्या वर्षी कधी एकदा हे कॉलेज संपतय अस वाटत असतं पण आता जेव्हा कॉलेज संपलय तेव्हा अस वाटतंय की वेळेला मागे करून पुन्हा कॉलेजला जाव आणि वेळेला तिथेच थांबवून ठेवावं आणि आयुष्यातील  मजा मस्ती तशीच कायम रहावी.
        पहिल वर्ष नवनवीन मित्रमैत्रिणी बनवण्यात गेलं. पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम कॉमन असल्याने सगळ्या department ची मुलं एकत्रच असतात, एकत्रच मजा मस्ती करतात, स्पोर्ट ला एकत्र खेळतात. तो आनंद वेगळाच असतो कारण दुस~या वर्षापासून ते वेगवेगळ्या संघातून खेळतात. या सगळ्या मित्रमैत्रिणींची उणीव दुस~या वर्षी प्रकर्षाने जाणवते.
        दुस~या वर्षीपासून खरी कॉलेज लाईफ सुरु होते. रोज काहीतरी नवनवीन शिकायला मिळत. अभ्यासक्रम कितीही कठीण असला तरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी सगळ्या पेपरचा अभ्यास पेपरच्या आधीच्या एकाच दिवसात करणार. १२ वी ला ६०% पेक्षा जास्त मार्क्स असलेल्या या मुलांना नंतर नापास होण नॉर्मल गोष्ट वाटू लागते. आणि all clear झाल म्हणजे ढगाला हात लागल्यासारख वाटू लागत. lectures जास्त करून बंकच करतात पण जरी अटेंड केले तरी विद्यार्थी फक्त शरीराने उपस्थित असतात  पण मनाने मात्र स्वतःच्याच दुनियेत असतात. assignment कितीही मोठी  देत ती  एका रात्रीत  पूर्ण होते फक्त लास्ट डेट डिस्प्ले झाली पहिजे. शिक्षकांची नेहमी तक्रार असते की मुल मुलं  sport आणि gathering ला जेवढा उत्साह दाखवतात तेवढा अभ्यासात का दाखवत नाहीत? अशीच मजा मस्ती करत आमचंही दुसर आणि तिसर वर्ष अगदी सहज गेलं. 
        आणि राहिलं ते फक्त शेवटचं वर्ष BE! शेवटचं वर्ष म्हणून आम्ही नेहमीच उत्साही  असायचो. सातव सेमिस्टर अभ्यासातच म्हणजे lectures, practicals यामध्ये गेलं, पण मजा मस्ती होतीच.  Lectures ना बारीक सारीक गोष्टींवरून जोक मारणं आणि आपल्यातच हसण बसण. फ्रेंड्सना कागदावर मेसेज लिहून पाठवण, अशी chating करण्यात जी मजा आहे ती WhatsApp आणि Facebook मध्ये कुठून येणार? हा हा म्हणता सेमिस्टर संपत, viva सुरु होतात, एरवी रिकामा दिसणारा परिसर मुलांनी एकदम गजबजून जातो. घरी कुणीच वाचून येत नाहि. कारण lab च्या बाहेर बसून एकत्र शिकण्यात येणारी मजा तिथे नसते. सगळ तिथेच बसून शिकायचं आणि viva ला जायचं. शेवटी काय तिथे वेगळेच प्रश्न विचारतात. Viva देऊन आलेला विद्यार्थी इथे celebrity असतो. प्रत्येकजण त्याला विचारणार,"काय विचारलं?","External कसा आहे?", वगैरे वगैरे. 
       Viva संपतात PL सुरु होते. PL ला थोडाफार अभ्यास करतो पण फक्त घरातल्यांना दाखवण्यासाठी. खरा अभ्यास पेपरच्या आदल्या दिवशीच. मग काय? पेपर चांगला गेला तर आनंदाचा सुखद धक्का आणि खराब गेला तर ठरलेलं कारण,'पेपर फिरलेला यार!'
        मग आठव सेमिस्टर सुरु होत. ह्या सेमिस्टरची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. कारण हे सेमिस्टर येतच मुळी आनंदाचं उधाण वारं घेऊन. ह्या सेमिस्टर मध्ये प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव देऊन जातो. प्रोजेक्टच्या नावाखाली २ - २ दिवसाच्या ट्रिप निघतात.  त्यात sports, technical festival, gathering या सगळ्यात दिवस कसे भराभर उडून जातात. Sports ला आपल्या टिमला सपोर्ट करायला सगळ department एकत्र येत आणि जोरजोरात नारेबाजी सुरु होते. त्याकाळात वेगवेगळ्या department च्या विद्यार्थ्यांमध्ये रुसवे-फुगवे येतात खरे पण gathering, technical festival ला हे वादविवाद कुठल्याकुठे गायब होतात. Gathering ची तयारी एक महिना आधीच सुरु होते. नृत्य, गाणी, नाटकं, fashion show अशा विविध कलागुण सादरीकरणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात साजरा होतो. हे तीन इवेंट झाले कि कॉलेज संपत आलय आणि शेवटचे काही दिवस मजा मस्तीचे उरलेत याची जाणीव होते. यानंतर एक महत्वाचा कार्यक्रम होतो निरोप समारंभाचा. शिक्षक शुभेच्छा देतात भविष्यासाठी. परीक्षा होतात. आणि खरा निरोपाचा दिवस येतो. पण वेळ काही कुणासाठी थांबत नाही. पक्ष्याला आकाशात उंच भरारी मारायची असेल तर घरटं सोडावंचं लागतं, त्याला पर्याय नसतो,
        म्हणतात ना,"गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी". 
याचं आठवणीच गाठोड घेऊन पुढची वाटचाल करायची असते.
Missing You Guys………… 
   

Tuesday, August 4, 2015

माझी माय

या  ब्लॉगवर  एक  नवीन  गोष्ट  प्रकाशित करतेय . हि  माझ्या  आईची  गोष्ट आहे . तुमच्या  सगळ्यांशी  हि  गोष्ट  शेअर करताना  खूप  आनंद  होतोय.

माझी माय 

विधात्याने माझी आई स्मिता संजय रेडकर हिला १९६२ मध्ये मांगल्याची मूर्ती म्हणून या पृथ्वीवर जन्माला घातलं.माझ्या मामाच घर बांदा ह्या छोट्याश्या पण निसर्गाने नटलेल्या गावात आहे.घरात सहा भावंड.त्यातली ती शेंडेफळ. एकुलता एक भाऊ आणि पाच बहिणी. आई सांगते त्याप्रमाणे माझे आजोबा खुप उदारदिल होते.त्यांनी त्या काळी घरात सहा  मुले असतानाही एका गरीब मुलीला दत्तक घेतलं होत.माझी आई तिचा उल्लेख इंद्रा आक्का असा करते.वडिलोपार्जित जमीन फार होती.माझ्या सगळ्यात मोठ्या मावशीचा त्या काळी बालविवाह झाला.आई तशी लहानच असताना तिचे आई आणि वडिल दोघेही सहा सहा महिन्यांच्या फरकाने निधन पावले.त्यावेळी आईचे वय फारसे नव्हते,एवढे कि तिला त्यांचा चेहराही आठवत नाही.आई आणि मोठी मावशी यांत जवळपास २० वर्षांचा फ़रक.भावंडांच्या मनात एकमेकांबद्दल अफाट प्रेम आणि मामा तर फारच लाघवी.वयाच्या ८ ते १० वर्षांपर्यंत तिला आईवडिल नसल्याची जाणीवही नव्हती. वडिलांच्या निधनानंतर सगळी जबाबदारी मामावर आली. मामाने मुंबईला वेल्डिंगचा कोर्स केला होता.त्या शिक्षणाच्या जोरावर त्याने कंपनी सुरु केली.आई चौथित असताना शाळेत लागणारे रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपआपल्या आईचे नाव लिहून आणण्यास सांगितले.त्यावेळी आईची चुलती त्यांचा अगदी आईप्रमाणे सांभाळ करी.अशी चुलती लाभायला पण भाग्य लागत.आणि आई तिचा उल्लेख 'आई' म्हणूनच करी.त्यामुळे साहजिकच आईने तिचे नाव लिहून नेले. बाईंच्या ते लक्षात आले कारण मधले नाव वेगळे होते.त्यावेळी सुमा मावशी आईच्या पुढच्याच वर्गात होती.तर बाईंनी तिला याबद्दल विचारले असता ती म्हणाली,"आम्हाला आईवडिल नाहीत,ती चुलतीच नाव सांगतेय". या एका वाक्याने तिच्या स्वभावात जो काही अमुलाग्र बदल झाला तो अजूनही तसाच आहे.त्यानंतर तिने काकीकडे किंवा भावंडांकडे कधीच कुठलाच हट्ट केला नाही.कुठलही काम करण्याची तयारी आणि कुठल्याही खडतर परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची तिची तयारी असते. 
        आजपर्यंत आलेल्या कुठल्याही प्रसंगाला तिने नाव ठेवली नाहीत.अगदी धाडसाने तोंड दिले.पुढे मामाने आईला शिकवले. दहावी पर्यंतच शिक्षण जवळच्याच हायस्कूलमध्ये झालं.त्यानंतर बारावी झाली.माझ्या मामाने या सगळ्याचा खर्च एकट्याने झेपावला.बागायती केली.त्यानंतर मामाने तिला डि एड\ करायला देवगड(मिठबाव)ला पाठवल.कारण स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं इतरांवर अवलंबून राहू नये या मताचा तो होता.तो स्वत: फार महत्वाकांक्षी,जिद्दी,कष्ट घेण्याची तयारी असणारा आणि प्रेमळ होता.डि एड\ झाल्यावर ४ वर्षे तिला नोकरी नव्हती.त्यामुळे येणारा ताण,लोकांची बोलणी सगळ तिने सहन केल.काजू फ़ैक्टरीत काम केल,मुलांचे क्लास्सेस घेतले.४ वर्षांनी नोकरी लागली कणकवली(कारंजे) येथे.त्यानंतर अजून एक घटना घडली, इंदिरा गांधींचा खून झाला आणि त्यावर्षी लागलेल्या सगळ्यांना ब्रेक देण्यात आला.हा ब्रेक ८ महिन्यांचा होता.त्याकाळात खुप ताण होता.पुन्हा नोकरी मिळेल कि नाही याच टेन्शन होत. पण नशिबाने साथ दिली आणि पुन्हा नोकरीचा कॉल आला.त्यानंतरच्या काळात संपूर्ण कुटुंबाला अजून एक मोठा धक्का बसला,तो म्हणजे मामाचे अपघातात झालेले अचानक निधन.मामाच्या निधनाने आई पार खचून गेली.फक्त आईच नाही तर सगळ कुटुंबच पूर्ण खचून गेल.मामाच निधन झाल त्यावेळी मामाची मुलगी फक्त ५ वर्षांची होती.पण मामीने आग्रह करून आईच्या लग्नाचा घाट घातला आणि माझ्या वडिलांशी म्हणजे संजय रेडकर यांच्याशी तिचा विवाह झाला.
        माझ इंजिनिअरिंग पूर्ण झाल आणि माझा भाऊ बी.एस्सी ला आहे.आईवडिलांनी स्वत:प्रमाणे आम्हालाही उच्च शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलय.आईचा शांत स्वभाव,चिडचिड नाही. कुठल्याही गोष्टीत आमची चूक झाली तरी शांतपणे समजून सांगते.तिने तिला जे जे नाही मिळाल ते सगळ आम्हाला द्यायचा प्रयत्न केलाय आणि पप्पांनीही तिला आदर्शवत साथ दिलीय. लहान असताना कित्येकदा मारलेही आहे,पण त्याचे महत्व आज कळते आहे.मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांशीहि आई अगदी मैत्रिणीप्रमाणे वागते.
       माझ्या मैत्रिणी कित्येकदा मला विचारतात तुझी बेस्ट फ्रेंड कोण अस,यावर माझ एकच उत्तर असत,"माझी आई ". 

                                                                                                                                         शुक्रयाणी रेडकर 

                                                           


    

मनोगत

मनोगत 

या  ब्लॉगची सुरुवात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी करतेय . माझी लेखणी आवडली तर नक्की प्रतिसाद द्या. मला तुमची मत ऐकायला, तुमच्याशी संवाद साधायला आवडेल. प्रत्येक गोष्टीनंतर तुमच्या comment द्यायला विसरू नका . मला तुमच्या उत्तराची प्रतीक्षा राहिल.