Monday, February 19, 2018
अनुभवाची गोष्ट
नमस्कार मित्रहो,
खूप दिवसांनी आज तुम्हा सर्वांशी बोलतेय. पण आज तुम्हा सर्वांना एक अनुभव सांगावा असं वाटलं.
काही दिवसांपूर्वी मी गुजरातचा प्रवास केला. या प्रवासमध्ये एक छोटासा प्रसंग घडला आणि अगदी मनाला स्पर्श करून गेला. तर घडलं असं,
मी भुज एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होते. माझ्या बाजुला एक मध्यम वयीन काका बसले होते. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी खाण्यासाठी म्हणून चुरमुरे घेतले. हातातून पॅकेट सटकले आणि काही दाणे जमिनीवर पडले. खार तर तुम्ही किंवा मी असतो त्या जागी तर काय केलं असतं ? ते तसाच टाकून उरलेले दाणे पोटात गेले असते. काय बरोबर ना ? पण तुम्हांला सांगते त्या सदगृहस्थाने सगळे दाणे उचलले आणि कागदात गुंडाळून बागेत ठेवले.
तसं पाहिल तर हि अगदिच क्षुल्लक गोष्ट आहे. अन पाहिलं तर फारचं मोठी गोष्ट आहे. आपण कधीच या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत नाही. पंतप्रधानानी स्वच्छता मोहीम राबवली खरी अन खूप मोठ्या पातळीवर नेली. वाटलं सुद्धा कि आता भारत सुधारेल पण तसं झालं नाही. अन हा सुधार अचानक होणार हि नाही जोपर्यंत आपण आपल्या ह्या अश्या छोट्या सवयी बदलत नाही. आपल घर स्वच्छ राहावं म्हणून आपण किती प्रयत्न करतो पण आपला परिसर ,आपला देश स्वच्छ रहावा हि आपली जबाबदारी नाही का ? अन आपण त्यासाठी तेवढीच मेहनत घ्यायला नको का ?
आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी महाराजांना अपेक्षित असं स्वराज्य घडवुया. प्रत्येकानं जर त्यांचा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच स्वराज्य घडेल. अगदीच महाराजांचा स्वराज्य आणि हाच असेल शिवजयंतीचा उत्सव. तुम्हा सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Saturday, July 30, 2016
तू आणि मी
अगं तुझ्या मेसेजची वाट बघून खुप दमलो,
पण तुझा विचारात फार रमलो........ ।।१।।
रात्र संपेना, विचार संपेनात,
अन डोळे पण मिटेनात ................ ।।२।।
वाटतंय खुप चुकलो मी
म्हणूनच खुप घाबरलोय मी................।।३।।
वाटतंय कि तू सोडशील आता माझा हात
पण अगं मला हवी फक्त तुझी साथ................ ।।४।।
तू म्हणतेयस मी नाही राहिलो तसा ,
तू बोलतोस ओरडतोस रागावतोस ................।।५।।
पण हे सगळं खरं असलं तरी,
Saturday, July 2, 2016
प्रेयसी
तुझ्यासारखी असावी Lover ,
किती करतेस तू मला Cover ।।१।।
पाहताक्षणी bells उडाल्या
झालो clean bold ,
एका नजरेत धडधड वाढली
झाला हा दिल sold ।।२।।
आलीस जवळ भिडली नजर
केलास handshake,
जपून तो हात दिवसभर
मन का करतय retake ।।३।।
झाला गोंधळ सा-यांचा
बसलीस जेव्हा side ला,
राग वाढला त्या रोमिओंचा
आले माझ्यासवे fight ला ।।४।।
धरली कॉलर फुटला घाम
वाटले game झाला,
तुझ्या बसण्याचं दाम
भलताच तुटून पडला ।।५।।
तरीही catch करतोय तुझ्या अदा
कधी infront तर कधी backside
कितीही patch तरी हा heart फिदा
तूच दिसते त्याला inside आणि outside ।।६।।
सगळं year केला कहर
माझ्या या feeling चा
writting करू किती letter
Eyes path तो पोचवायचा ।।७।।
read करशील कधी ना कधी
Believe आहे या lover चा
fall in love आहे तुझ्यामध्ये
relief आहे या daily life चा ।।८।।
केली daring आणि rocking prupose
with rose अन gift
झाले pairing अन feeling angle reposed
with close अन lift ।।९।।
माझी परी
सकाळीच उठल्यावर खिडकीतून पाहिल्या पावसाच्या सरी
स्वप्नात आली होती माझी सुंदर परी
स्वप्नातल्या जगात ती असते माझा कुशीत
जस लहान मूल असत तिच्या आईच्या मिठीत
हातात हात होता, डोळ्यात डोळे
वाटत होतं की जन्मभराचा साथ होता
आता असेलही माझं स्वप्न फक्त स्वप्न
नसेलही ती माझा जवळ, माझा मिठीत
पण माझा विश्वास आहे
एक दिवस असेल ती माझाच कुशीत,
फक्त माझा मिठीत .........
नवी दिशा
चालत आहे नव्या दिशेला
नव्या जगाच्या वाटेला
वाटसरू मी नव्या दमाचा
उत्तुंग भरारी ध्येयाचा ।।१।।
सोबतीस जरी भले मिळाले
आम्हा आशा न सोबतीची
स्वप्न उरी जे आम्ही थाटले
त्याला जोड दिली ती कष्टाची ।।२।।
संकटातही भले भले थकले
आम्हा सवय ती लढण्याची
शब्द आमुचे ते खड्ग बनले
त्यांना धार ती सूर्य किरणांची ।।३।।
समीप आले ध्येय आमुचे
परी पाय न चालण्या थकले
लक्ष्य आमुचे अवघड जरी
तरी अंतर जिद्दीने कापले ।।४।।
झाला हर्षित प्रवास अमुचा
आठवणींचा तो स्मरणाचा
असा अमर मी वाटसरू तो
घाव सोसतो ह्या काळचा ।।५।।
Subscribe to:
Posts (Atom)