बाबा
आईचा लळा वेगळा असतो, मान्य आहे. आईची माया वेगळी असते, मान्य आहे. आईसारखी दुसरी कोणीच नाही, हे देखील मान्य आहे. पण बाबासुद्धा तितकेच लढतात… तितकेच खंबीरपणे मुलाच्या पाठीशी उभे राहतात… तितकाच जीव लावतात…! मुलं नीट सेटल होतायेत ना, हे बघण्यातच त्यांच उभ आयुष्य निघून जात. नसतील होत तर त्यांना सेटल करण्यात जात. त्यांना सगळ येण अपेक्षित असत. बाबांकडे 'नाही' हा शब्द नसतोच बहुधा…! आई ग्रेट असतेच किंबहुना ती मायमाऊली असते पण बाबा फक्त बाबा असतात. मुलीचं पाहिलं प्रेम आणि मुलाचा पहिला हिरो त्याचे बाबाच असतात. दुनियेतल्या प्रत्येक मुलासाठी बाबा ते असतात जे सगळे ऑप्शन संपले की सुरु होतात. आणि मग पाऊले आपोआप त्यांच्या दिशेने वळु लागतात. A friend, guide & philosopher…!!!
प्रत्येक बापासाठी त्याचा मुलगा-मुलगी हा त्याचा अभिमान असतो. जेव्हा त्यांना आपल्या मुलाप्रती वाटणारा अभिमान सर्वांच्या समोर व्यक्त करायचा असतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आपसूकच पाण्याच्या धारा येतात.
बाबा… एक बापमाणुस… कामाचा कितीही ताण असला तरी घरी न आणणारे 'सुपरकुल' बाबा... कुठलंही काम 'हो जायेगा' असा म्हणणारे 'जादुगार' बाबा... आपल्यावर सर्वात जास्त विश्वास टाकणारे आपले बाबा…. रडत असलो की कुशीत घेणारे बाबा… मात्र कधीही आपल्यासमोर न रडणारे बाबा… म्हणूनच प्रत्येकाच्या मनातल अढळस्थान म्हणजे बाबा….!
(लेखक)
अनुपम कांबळी
(लेखक)
अनुपम कांबळी
Very true.....
ReplyDeleteVery true.....
ReplyDelete