Showing posts with label poems. Show all posts
Showing posts with label poems. Show all posts

Sunday, December 13, 2015

एक दिशा जीवनाची

एक दिशा जीवनाची,
ओढ नव्या जगाची,
एक दशा व्यथांची,
हे अपयश कालोखाचि.


स्वप्नं नाही खोटी,
जी पाहतो झोपेत.
हरतो सारी हिम्मत
आम्ही एका ठेचेत.


उठतानाहि हातांची
आशा का करावी.
उजवाडणा-या नभात
ध्येये उंच उडवी.


जगताना कठीण तेच का
वाट्याला आमच्या.
शक्ती आहे मारुतीसारखी
झाकल्या गेल्या मुठींच्या.


तरीही आदर्शांंच्या व्यक्तींची
कास आम्ही का धरावी.
आम्ही घडवू जीवन आमचे,
भविष्य रेखाहि खेचावी.

Thursday, October 29, 2015

तरी ती दोन मने अबोला पाळायची

रोज आमची भेट व्हायची
नजरेला नजर थेट भिडायची
प्रेमाची तलवार काळजात घुसायची
तरी ती दोन मने अबोला पळायची

वर्गात रोज बाजुला बसायची
चोरून चोरून जरी पहायची
कधी कधी तर नजर मिळायची
पटकन सावरून नजर चुकवायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

प्रेम दोघांचे ऊतू जायचे
ओठांवर दोघांच्या आणि फुटायचे
मनात दोघांच्या खुप वाटायचे
तरी ती दोन मने अबोला पाळायची

त्या मनाचे ठसे वाटेत उमटायचे
एवढ असूनही ते दोघ एकच मानायचे
तरी ती दोन मने अबोला पाळायची

तो तिची वाट न ती त्याची वाट रोज बघायची
एकमेकांना पाहून खुष व्हायची
इतका एकमेकांना जीव लावायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

उजाडला की दिवस दोघे ठरवायची
आज बोलून टाकूच सगळ पक्क करायची
समोर येताच शब्दच विसरायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

हि तर कथा तुम्हा ऐकवायची
म्हणून हि तर कविता बनवायची
ती तुम्ही वाचून पहायची
आवडली तर कॉमेंट करायची
मनी आठवून वाचणारी रडायची
कारण हि कविता त्यांचीच असायची

Monday, October 19, 2015

शेवटी मी तुझीच रे

शेवटी मी तुझीच रे
शेवटी मी तुझीच रे

तुझ्यातच शोधलेल सुख 
तुझ्यासोबत वाटलेलं ते दुःख  
अन संशयाने केली मी ती चूक 
अजूनही मला सलतेय रे 
अजूनही मला सलतेय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

तुझ्या मनात होत ते प्रेम 
माझ्या मनात का नाही 
तू सोडली नाही ती साथ 
अन मी सोडला तो हात 
अजूनही तुला शोधतोय रे 
अजूनही तुला शोधतोय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

बोलायचं होत तुला खूप 
पण मला वेळ नव्हता 
आता मात्र मी मोकळी 
पण तू जवळ नव्हता 
अजूनही आतुर आहे रे 
अजूनही आतुर आहे रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

तुझ्यासोबत रमत जगले 
तेच खरे जीवन 
आठवताच अश्रू ढाळतात 
माझे हेच नयन 
अजूनही धारा वाहतात रे 
अजूनही धारा वाहतात रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

घडला मला तुझा तो सहवास 
फुलांचा दरवळला तसा तो सुवास 
अजूनही मी घेत आहे रे 
अजूनही मी घेत आहे रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

आता धसके खाऊ लागलाय 
तो माझा श्वास 
अन तुझ्या परतण्याचा तो प्रवास 
अजूनही आस तुझी धरतोय रे 
अजूनही आस तुझी धरतोय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

व्यथा



आवाजाची मधुरता कानात गुणगुणते 

रुपाची सौंदर्यता डोळ्यांत लुकलुकते 

तुझ्या विना विरहाची कल्पना जीवाला तळमळवते 

तुझ्यात गुंतल्या जीवाची व्यथा स्वतःशीच भुणभुणते 

भेट

भेट तुझी माझी व्हावी एका सुनामीसारखी

सागराच्या लाटांच्या वादळी भावनेसारखी

प्रेमाची साक्ष त्या प्रेमी किना-यासारखी

ओथंबून ओंजळ सुख परी दुःख त्यांच्या विरहासारखी

Saturday, October 10, 2015

स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात

आता मात्र देवा तुलाच दोष देतात,
स्वतःवरच खापर तुझ्या नावावर फोडतात.

जगण्यासाठी हात दिलेस चांगल्या वापरासाठी,
सगळ सोडून आम्ही कामी आणलेत आपल्या स्वार्थासाठी.
उपकाराची भाषा विसरून,
तुझे गुणगान गातात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या नावे फोडतात.

डोळे देऊन उपकार केलेस आम्हा मानवावर,
बघणे वाचणे विसरून,
आम्ही जळतो एकमेकांवर.
दुस-यावरचा अन्याय डोळे बंद करून पाहतात.
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

चलण्यासाठी पाय दिलेस,
केलीस उणीव कमी,
लाथ उगारण्यात आयुष्य घालवतो आम्ही नराधमी.
मदतीसाठी आमचे पाय कधीच नाही धावत,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

झाली सगळी रोजचीच दुःखे,
तुझ्या दारी मांडतात,
वेळेविना काहिच न घडतं,
कधीच हे न जाणतात.
हात समोर जोडून,
मनात शिव्या घालतात.
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

हृदयासारखी सुंदर गोष्ट माणसापाशी नाही,
आहे म्हणतो आम्ही जरी,
तीचे मोल आम्हा न ठायी.
एकमेकांविषयी क्लेश भरण्यासाठी वापर करतात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

भगवद गीतेत तुच आहेस यांना ठाऊक नाही,
वेळ फक्त टाइमपाससाठी आहे,
ते वाचण्यासाठी नाही,
अशी फालतू कारणे देऊन तुलाच उलट बोलतात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.
(कवि-केशव सावंत )

आठवणी

अश्रूंच्या सरी धाऊन आल्या,
नकळत माझ्या डोळ्यांमध्ये.

तुझ्या आठवणी जाग्या झाल्या,
नकळत माझ्या हृदयामध्ये

तुला कधी न सांगता आल्या,
शब्दच अडले ओठामध्ये.

परी शेवटी सावली उरल्या,
तुझ्या माझ्या या नात्यामध्ये.

तुला कधी न सामिल केले,
मला होणा-या वेदनांमध्ये.

तुझेच तुजला कळून चुकले
सलत राहिल्या भावनांमध्ये.

(कवि - केशव सावंत)

Sunday, September 6, 2015

मैत्री

मैत्री 

मैत्रीचे  धागे कधीच नसतात तुटणारे 
जुन्या आठवणी आठवून गालात हसणारे 
कधी कधी क्षणात रडवणारे 
मैत्री म्हणजे अतूट विश्वास 
आयुष्यातल्या प्रेमाचा प्रवास 

मैत्रीत असतो हक्क 
त्यात असत प्रेमाच बंधन पक्क 

मैत्रीत मिळतो संद्याकालचा गार वारा 
ज्यामध्ये बरसतात नेहमीच मस्तीच्या गारा 

मनात असतो आठवणींचा खेळ 
असाच कधीतरी जमतो मग मैत्रीचा मेळ 

मैत्रीचे धागे कधीच नसतात तुटणारे 
जुन्या आठवणी आठवून गालात हसणारे
 

Wednesday, September 2, 2015

परिक्षा

परीक्षा 

परीक्षा म्हणजे कंटाळा 
परीक्षा म्हणजे अभ्यास 
परीक्षा म्हणजे आहे ते नको असताना 
ताटात जबरदस्ती वाढलेली कारल्याची भाजी खास. 


परीक्षा म्हणजे जागरण 
परीक्षा म्हणजे अडथळा 
परीक्षा म्हणजे जमत नसताना 
बुद्धीचा केलेला खुळखुळा. 


परीक्षा म्हणजे tension 
परीक्षा म्हणजे study चे section 
परीक्षा म्हणजे कुठलं तरी 
भुलभुलैय्या वाल mansion . 

परीक्षा म्हणजे जबरदस्ती 
परीक्षा म्हणजे दबावाखालील मस्ती 
परीक्षा म्हणजे exam hall मध्ये 
काही येत नसताना आलेली सुस्ती. 

परीक्षा म्हणजे यश किंवा अपयश 
परीक्षा म्हणजे वीस किंवा पंचाहत्तर 
परीक्षा म्हणजे answers येत नसताना 
पेपर मध्ये ठोकलेल उत्तर. 

अशीच उत्तर लिहून education पूर्ण होत 
पण आयुष्यातील परीक्षा मात्र संपत नाही.