Thursday, September 10, 2015

दिल दोस्ती दुनियादारी


   दिल दोस्ती दुनियादारी 
 
      दिल दोस्ती दुनियादारी......zee marathi वर लागणारी एक मालिका. मैत्री असावी तर या सहा जणांसारखी. खर तर आपली भारतीय संस्कृती अशाप्रकारे मुलामुलींचं एकत्र राहणं याला मान्यता देत नाही. पण तरीही फक्त निखळ मैत्रीवर चालणारी हि मालिका अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे आवडीने बघतात. तस खुप मोठ अस काहीच घडत नाही या मालिकेत, म्हणजे इतर मालिकांमधे जसे वाद होतात, एकमेकांचे हेवेदावे केले जातात, खुन,मारामा-या केल्या जातात तस काहीच होत नाही. अगदी साधे साधे आपल्या रोजच्या आयुष्यातील विषय सहज लोकांसमोर मांडले जातात. तिथे दिसते ती निखळ मैत्री  आणि मित्रांमधील प्रेम. 
        कधी हे मित्र  किशोर कुमारांचा वाढदिवस साजरा करतात, तर कधी मैत्रीची भेळ बनवतात तर कधी एकमेकांना कुटुंबियांसारख प्रेम देतात आणि मित्र म्हटलं की मस्ती येणारच.
        असे मित्र असणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. मैत्री सारख दुसर नातं नाही. कसलीच अपेक्षा नाही, कसला भेदभाव नाही. 
        आमचे कणकवलीतले दिवस पण असेच होते. भन्नाट, मजा मस्तीने भरलेले. आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही फक्त कॉलेजचे  मूल-मुली रहायचो. त्यामुळे हि मालिका बघताना त्याच दिवसांची आठवण होते. रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण, केक खाण्यापेक्षा जास्त तोंडाला फासणं, परीक्षा आली की रात्रंदिवस एकत्र अभ्यास करणं, पेपर झाला की त्या रात्री एकत्र मस्त एक हॉरर cinema बघणं, वर्ल्ड कपचा सामना म्हणजे तर काय धिंगणा घालायला एक निमित्तच. मोठ्याने गाणी लावणे, कधी कधी तर बाटल्या, डबे वाजवून स्वतःचचं मनोरंजन करायचो. मेसच्या जेवणाचा कंटाळा आला की सगळ्यांसाठी maggy चा बेत. Maggy बंद झाली खरी पण हे कळायच्या आधी आम्ही किती किलो maggy पचवली आणि किती लिड शरीरात गेल असेल याच मोजमापच करता येणार नाही. 
        पण खरच, आयुष्यात कधीतरी असा मित्रांसोबत वेळ घालवावा, मजामस्ती करावी. या  सगळ्यात घरच्यांची आठवण सतवते खरी पण मैत्रीतलं हे सुख एक वेगळाच अनुभव देऊन जात.

No comments:

Post a Comment