Saturday, August 15, 2015

भारत प्रगती पथावरचा…………

आजच आपण सगळ्यांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण ह्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एक आढावा घेऊया कोणत्या बाबतीत देशाने प्रगती केली आणि अजून किती प्रगती आपल्याला करायची आहे याचा. 
         स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आपल्याला हव तसं आयुष्य जगण ना ? ब्रिटिशांपासून आपण स्वातंत्र्य मिळवलं याला ६९ वर्ष झाली. या दरम्यान खूप प्रगती झाली. गावोगावी शाळा, कॉलेज झाली. मुलाना शिक्षणाचा अधिकार मिळाला. government हॉस्पिटल मधून आरोग्याच्या सोयी सुविधा झाल्या. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं. बालकामगारांवर बंदी घालण्यात आली. आपल्या आवडत्या entertainment च्या दुनियेत पण खूप प्रगती झाली. गावोगावी रस्ते झाले. पत्रकारिता पण खूप कणखर झाली. TV च्या माध्यमातून सगळ्या बातम्या तात्काळ लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. शहरीकरण झाले. मुलांना नवीन तंत्रज्ञानाशी ओळख करून देण्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले. आणि त्याबद्दल आताच्या आणि पूर्वीच्या सरकारचे मनापासून अभिनंदन. 
          जेवढी प्रगती झालीय तेवढ्याच समस्या पण निर्माण झाल्या. शहरीकरण झाले पण कच~याचा प्रश्न निर्माण झाला.कच~याची विल्हेवाट हि मोठी समस्या आज भारतापुढे उभी आहे. त्यामुळे पसरणारी दुर्गंधी वातावरण कलुषित करते. त्या किटाणूंमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचे साम्राज्य पसरते. स्वच्छ सुंदर भारत योजना सरकारने राबवली खरी पण त्याचे अपेक्षित परीणाम अजून दिसत नाहीयेत. प्लास्टिक कचरा हा वेगळा चर्चेचा विषय बनत आहे.शाळा झाल्या अजूनही कित्येक मुलं त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत.  पावसाच्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नाहीयेय उत्तम उदाहरणं म्हणजे मुंबई. Government हॉस्पिटल्स तर आहेत पण तिकडे doctors ची कमरता आहे. यासगळ्यात भारतीय सिनेमा मात्र परदेशात जाऊन पोहोचलाय. आणि यशाची पावलं पुढे टाकतोय. शाळा कॉलेज मधून विद्यार्थी शिक्षण घेताहेत पण अपू~या रोजगाराच्या संधीमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेय. एकीकडे जीवनावश्यक वस्तु महागताहेत तर दुसरीकडे smartphones सारख्या वस्तूंची किंमत कमी होतेय. यामुळे शाळेत जाणा~या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांकडे smartphones दिसतात. अस असताना स्वच्छ पाण्याची मोठी समस्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अपु~या पावसामुळे आणि डोक्यावरच्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि शेतक~यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. 
         एकीकडे देश अवकाशात नवीन satellite सोडतोय तर दुसरीकडे भारत मातेच्या मुलींवर मात्र अत्याचार वाढत चालले आहेत. प्रगतीतील हे एवढी तफावत? भारतीय समाजहि अजून म्हणावा तसा सुधारलेला नाही. जातीपातीवरून अजूनही वाद होतात. कमी जातीच्या लोकांना अजूनही म्हणावा तसा सम्मान मिळालेला नाही. वेगवेगळ्या धर्माची लोक कधी एकत्र नांदणार कोण जाणे. 
          आपल्याला एक आदर्श भारत घडवायचा आहे. ज्यात प्रत्येक व्यक्तीला समान हक्क असतील कायद्यानुसार तसच समाजातही. प्रत्येक स्त्रीला योग्य तो सम्मान आणि सुरक्षितता मिळायला हवी. आपला भारत स्वच्छ सुंदर असायला हवा, ज्याच्याकडे इतर देश आदराने बघतील.  

No comments:

Post a Comment