Tuesday, August 11, 2015

आजची स्त्री

आजची स्त्री


आपण म्हणतो आजची स्त्री, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. पण तरीही मला अस वाटत कि, आजही स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले नाही. जर आपण इतिहासात पहिले तर अनेक स्त्रियांची उदाहरणे दिसतात. जस कि झाशीची राणी, तिने कमरेला मुल बांधून लढाई केल्याचा कथा आपण वाचल्या आहेत. पण त्या काळात इतर स्त्रियांवर मात्र बंधन होती. याचा अर्थ असा होतो का कि त्या पराक्रमी नव्हत्या? तर तसं नाहियेय त्यांना योग्य ते शिक्षण आणि संधी मिळाली नाही. त्यांना फक्त चूल आणि मुल यापुरतच मर्यादित ठेवलं गेलं. 
        २० व्या शतकातील स्त्रियांना तर ब~याच अंशी मागास जीवन जगावे लागत होते. वैधव्य दु:सह ठरत होते, बालविवाह बोकाळले होते, शिक्षणाचा तर पत्ताच नव्हता. स्त्रियांसंदर्भातील रूढीग्रस्तता भयंकर होती. चौथी, पाचवीतले शिक्षण थोर समजले जात होते. 
       त्याही आधीच्या शतकभरामध्ये राजाराममोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांनी सतीसारख्या कुप्रथेला विरोध केला. तसेच सावित्रीबाई,रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, गंगाबाई यांच्यासारख्या कित्येकजणींनी आपले सर्वस्व पणाला लावल्यामुळे बायकांच्या जगात पहाट फुटू लागली होती. 
        २१व्या शतकातील स्त्रीचे आयुष्य त्यामानाने बरचसे सुसह्य आहे. मुली शिक्षण घेताहेत, नोकरी करतात, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. पण तरीही आजही स्त्रिला म्हणावी तशी सुरक्षितता मिळालेली नाही. मुलींवर होणा~या बलात्कारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आईवडिलांना मुलगी नकोशी झाली आहे. हुंड्यासाठी कित्येक जणींचे बळी गेलेत आणि अजूनही जाताहेत. मुलगी नको म्हणून गर्भपात होत आहेत. म्हणजे खर पाहता मुलगी कुठेच सुरक्षित नाही. आईच्या गर्भातही नाही आणि बाहेरच्या समाजातही नाही. आजही कित्येक घरात मुलाला शिकवायचं आहे म्हणून मुलीचं शिक्षण अर्धवट सोडलं जात. आजही मुली रात्री उशिरा पर्यंत काम करू शकत नाहीत. आजच्या स्त्रीच आयुष्य फक्त चूल आणि मुल अस नसलं, तरी घराबाहेर पडल्यानंतर तिला या समाजाने उभ्या केलेल्या कितीतरी प्रश्नांना उत्तर द्यावीच लागतात. 
        मग या सगळ्याला जबाबदार कोण? सरकार, न्यायव्यवस्था कि अजून कोणी? या दोन गोष्टींशिवाय या सगळ्याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत. झालेल्या अन्यायानंतर कडक कारवाई केली जात नाही किंवा त्यांना योग्य ते शासन केलं जात नाही याला नक्कीच सरकार आणि न्यायव्यवस्था जबाबदार आहेचं पण तरीही नागरीक म्हणून आपली काही जबाबदारी नाही का? आपल्या घरातल्या स्त्रियांना स्वसंरक्षणाचे शिक्षण का दिले जात नाहीत? जर स्त्रिया सबळ झाल्या तर निम्म्या अपराधाच्या घटना कमी होतील. स्वसंरक्षणाचे धडे शाळांमधुन दिले गेले पहिजेत. 
        आपण म्हणतो कि समाज आजकाल खूप पुढे गेलाय पण तरीही समाजाची स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदललेली नाही. समाज तेव्हाही तिला वस्तू म्हणूनच पहायचा आणि आजही तसाच पाहतो. 
       पण आपल्याला हि मानसिकता बदलायची आहे. स्त्रिला या समाजात ताठ मानेने जगता आले पाहिजे. तिला योग्य तो मान मिळायलाच हवा. आणि हा बदल आपल्यासारखी तरुण पिढीच घडवून आणु शकते, नाही का?  

2 comments:

  1. Article is good...but does not shows the other side of the situation

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete