Saturday, August 22, 2015

डॉ. एं . पी . जे अब्दुल कलाम

डॉ. एं . पी . जे अब्दुल कलाम यांस पत्र 

        आदरणीय ,
         डॉ. एं . पी . जे अब्दुल कलाम

               सर तुम्हीच  म्हणायचात ,आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी आधी आपल्या डोळ्यात स्वप्न हवीत,ती पूर्ण होण्यासठी लागणारा विचार  हवा  आणि हवी जिद्द.आपले लक्ष आपल्याला माहित असायला हवे . MOUNT   EVEREST चढायचा असो,नाहीतर तुमच्या CAREER मधील सर्वोच्च पदाचा तुमचा प्रवास असो,वर चढण्यासाठी प्रचंड ताकदीची,मेहनतीची गरज असते .आपण जे बदलू शकत नाही ते मान्य करून इतर पर्यायांचा विचार करून आपला प्रवास चालू ठेवता येतो,जो प्रश्नापुढे  हार न मानता ते सोडवण्यासाठी योग्य ती आखणी करू शकतो, तोच त्याच ध्येय गाठण्यासाठी यशस्वी होतो . 
              सर तुम्ही MISSILE  MAN होतातच;पण त्याही पलीकडे स्वप्नाची जी महाआण्विक शक्ती तुम्ही आमचात जागवली.तिची कदर लोकशाही व्यवस्थेतील मतपेट्यांना कळण जरा अवघडच आहे . 
             "DARE  To DREAM" हा मंत्र तुम्ही आम्हाला दिलात आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला शिकवलित.मनावरची मरगळ झटकायला मदत केलीत. आमचा धैर्य वाढवलत. देशाचा राष्ट्रपतींचा आपल्यावर भरोसा आहे. मनात आणल तर आपणही महासत्ता बनण्याचा भारतीय स्वप्नांचा एक भाग होऊ शकू हे आम्हाला पहिल्यांदाच कळल. सर,तुम्ही वाढवलीत आमची हिंमत. स्वप्नांवर विश्वास ठेऊन अखंड ध्येयाने वाट कशी चालायची, याच मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुम्ही आमच्या समोर  उभे राहता. त्या वाटेवरून जाण्यात महाप्रचंड कष्ट पडतात हे आम्हाला दिसलं. पण हेही दिसलं की त्या वाटेवरून चाललं तर माणूस किती उच्च पदावर पोहचू शकतो. ते पद असत माणसाच्या मनातल्या आदराचं. 
             या  देशातील  तरुण पिढी समोर आदर्श नाही असा समज करून घेणा~यांना तरुणांची मन कधी  समजलीच नहीत,ती तुम्हाला समजली. हि तरुण पिढी तुम्हाला आदर्श मानून वाट चालायला लागली आहे. परीश्रम,सचोटी,पारदर्शकता आणि गुणवत्ता हे गुणच माणसाला यशस्वी करतात हे तुम्ही पटउन दिलंत. आमच्या पिढी समोर आदर्शच नाही असं म्हणायचं करणाच उरलं नाही ,याला जबादार तुम्हीच !
                                                                                           
                                                                                                                      तुमचे लाडके 
                                                                                                                       विद्यार्थी 

No comments:

Post a Comment