Friday, August 7, 2015

कॉलेज विश्व

ह्या रविवारी आपण सगळ्यांनी friendship day  साजरा केला. म्हणूनच हि नवीन पोस्ट मित्रांसाठी. 

 कॉलेज विश्व

कॉलेज  विश्व! पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंतचा हा ४ वर्षांचा प्रवास म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय काळ.
        कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटणारा एकटेपणा नंतरनंतर कुठे गायब होतो  स्वत:ला पण कळत नाही. कॉलेजच्या पहिल्या वर्षी कधी एकदा हे कॉलेज संपतय अस वाटत असतं पण आता जेव्हा कॉलेज संपलय तेव्हा अस वाटतंय की वेळेला मागे करून पुन्हा कॉलेजला जाव आणि वेळेला तिथेच थांबवून ठेवावं आणि आयुष्यातील  मजा मस्ती तशीच कायम रहावी.
        पहिल वर्ष नवनवीन मित्रमैत्रिणी बनवण्यात गेलं. पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम कॉमन असल्याने सगळ्या department ची मुलं एकत्रच असतात, एकत्रच मजा मस्ती करतात, स्पोर्ट ला एकत्र खेळतात. तो आनंद वेगळाच असतो कारण दुस~या वर्षापासून ते वेगवेगळ्या संघातून खेळतात. या सगळ्या मित्रमैत्रिणींची उणीव दुस~या वर्षी प्रकर्षाने जाणवते.
        दुस~या वर्षीपासून खरी कॉलेज लाईफ सुरु होते. रोज काहीतरी नवनवीन शिकायला मिळत. अभ्यासक्रम कितीही कठीण असला तरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी सगळ्या पेपरचा अभ्यास पेपरच्या आधीच्या एकाच दिवसात करणार. १२ वी ला ६०% पेक्षा जास्त मार्क्स असलेल्या या मुलांना नंतर नापास होण नॉर्मल गोष्ट वाटू लागते. आणि all clear झाल म्हणजे ढगाला हात लागल्यासारख वाटू लागत. lectures जास्त करून बंकच करतात पण जरी अटेंड केले तरी विद्यार्थी फक्त शरीराने उपस्थित असतात  पण मनाने मात्र स्वतःच्याच दुनियेत असतात. assignment कितीही मोठी  देत ती  एका रात्रीत  पूर्ण होते फक्त लास्ट डेट डिस्प्ले झाली पहिजे. शिक्षकांची नेहमी तक्रार असते की मुल मुलं  sport आणि gathering ला जेवढा उत्साह दाखवतात तेवढा अभ्यासात का दाखवत नाहीत? अशीच मजा मस्ती करत आमचंही दुसर आणि तिसर वर्ष अगदी सहज गेलं. 
        आणि राहिलं ते फक्त शेवटचं वर्ष BE! शेवटचं वर्ष म्हणून आम्ही नेहमीच उत्साही  असायचो. सातव सेमिस्टर अभ्यासातच म्हणजे lectures, practicals यामध्ये गेलं, पण मजा मस्ती होतीच.  Lectures ना बारीक सारीक गोष्टींवरून जोक मारणं आणि आपल्यातच हसण बसण. फ्रेंड्सना कागदावर मेसेज लिहून पाठवण, अशी chating करण्यात जी मजा आहे ती WhatsApp आणि Facebook मध्ये कुठून येणार? हा हा म्हणता सेमिस्टर संपत, viva सुरु होतात, एरवी रिकामा दिसणारा परिसर मुलांनी एकदम गजबजून जातो. घरी कुणीच वाचून येत नाहि. कारण lab च्या बाहेर बसून एकत्र शिकण्यात येणारी मजा तिथे नसते. सगळ तिथेच बसून शिकायचं आणि viva ला जायचं. शेवटी काय तिथे वेगळेच प्रश्न विचारतात. Viva देऊन आलेला विद्यार्थी इथे celebrity असतो. प्रत्येकजण त्याला विचारणार,"काय विचारलं?","External कसा आहे?", वगैरे वगैरे. 
       Viva संपतात PL सुरु होते. PL ला थोडाफार अभ्यास करतो पण फक्त घरातल्यांना दाखवण्यासाठी. खरा अभ्यास पेपरच्या आदल्या दिवशीच. मग काय? पेपर चांगला गेला तर आनंदाचा सुखद धक्का आणि खराब गेला तर ठरलेलं कारण,'पेपर फिरलेला यार!'
        मग आठव सेमिस्टर सुरु होत. ह्या सेमिस्टरची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. कारण हे सेमिस्टर येतच मुळी आनंदाचं उधाण वारं घेऊन. ह्या सेमिस्टर मध्ये प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव देऊन जातो. प्रोजेक्टच्या नावाखाली २ - २ दिवसाच्या ट्रिप निघतात.  त्यात sports, technical festival, gathering या सगळ्यात दिवस कसे भराभर उडून जातात. Sports ला आपल्या टिमला सपोर्ट करायला सगळ department एकत्र येत आणि जोरजोरात नारेबाजी सुरु होते. त्याकाळात वेगवेगळ्या department च्या विद्यार्थ्यांमध्ये रुसवे-फुगवे येतात खरे पण gathering, technical festival ला हे वादविवाद कुठल्याकुठे गायब होतात. Gathering ची तयारी एक महिना आधीच सुरु होते. नृत्य, गाणी, नाटकं, fashion show अशा विविध कलागुण सादरीकरणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात साजरा होतो. हे तीन इवेंट झाले कि कॉलेज संपत आलय आणि शेवटचे काही दिवस मजा मस्तीचे उरलेत याची जाणीव होते. यानंतर एक महत्वाचा कार्यक्रम होतो निरोप समारंभाचा. शिक्षक शुभेच्छा देतात भविष्यासाठी. परीक्षा होतात. आणि खरा निरोपाचा दिवस येतो. पण वेळ काही कुणासाठी थांबत नाही. पक्ष्याला आकाशात उंच भरारी मारायची असेल तर घरटं सोडावंचं लागतं, त्याला पर्याय नसतो,
        म्हणतात ना,"गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी". 
याचं आठवणीच गाठोड घेऊन पुढची वाटचाल करायची असते.
Missing You Guys………… 
   

No comments:

Post a Comment