Saturday, October 10, 2015

स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात

आता मात्र देवा तुलाच दोष देतात,
स्वतःवरच खापर तुझ्या नावावर फोडतात.

जगण्यासाठी हात दिलेस चांगल्या वापरासाठी,
सगळ सोडून आम्ही कामी आणलेत आपल्या स्वार्थासाठी.
उपकाराची भाषा विसरून,
तुझे गुणगान गातात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या नावे फोडतात.

डोळे देऊन उपकार केलेस आम्हा मानवावर,
बघणे वाचणे विसरून,
आम्ही जळतो एकमेकांवर.
दुस-यावरचा अन्याय डोळे बंद करून पाहतात.
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

चलण्यासाठी पाय दिलेस,
केलीस उणीव कमी,
लाथ उगारण्यात आयुष्य घालवतो आम्ही नराधमी.
मदतीसाठी आमचे पाय कधीच नाही धावत,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

झाली सगळी रोजचीच दुःखे,
तुझ्या दारी मांडतात,
वेळेविना काहिच न घडतं,
कधीच हे न जाणतात.
हात समोर जोडून,
मनात शिव्या घालतात.
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

हृदयासारखी सुंदर गोष्ट माणसापाशी नाही,
आहे म्हणतो आम्ही जरी,
तीचे मोल आम्हा न ठायी.
एकमेकांविषयी क्लेश भरण्यासाठी वापर करतात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

भगवद गीतेत तुच आहेस यांना ठाऊक नाही,
वेळ फक्त टाइमपाससाठी आहे,
ते वाचण्यासाठी नाही,
अशी फालतू कारणे देऊन तुलाच उलट बोलतात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.
(कवि-केशव सावंत )

No comments:

Post a Comment